Monday, July 21, 2014

प्रबळगड आणि कलावंती दुर्ग बघितला आहे किवा पाहायचा आहे अशा हौशी पर्यटक मित्रांना, हा ट्रेक आणि निसर्ग सौंदर्यपूर्ण परिसर कसा अनुभवायचा? याच्याबद्दल माझे स्थानिक मत..

(Food,Accommodation,,Guide,Service)

Nilesh:08056186321:Namdev:09209461474-08080982233:


Balu 08898723671-08097089491-8655323191:


Email ID:neel.nilesh0506@gmail.com)


Geographical Location of Fort:
The British Government wanted to develop Prabalgad as a hill station like Matheran but withdrew this plan on account of the difficulties caused by the lack of water which, though sufficient for the existing residents, Fort Muranjan or Prabalgad can be seen from Mumbai-Pune express highway. On the East side of fort you will find Ulahas River, Matheran, on the west side Gadhi River, Chanderi and Peb forts, the city of Mumbai, on the south side, the Patalganga river, Manikgad and on the north side, the Karnala fort. You can experience the twinkling lights of Mumbai city, Rasayani, Panvel and nearby areas from the height.
  Do you want to enjoy this ancient and naturally beautiful trek?
Do you want to enjoy this scenic trek to ancient areas of historical significance? Do you want to experience this fabulous, exciting spot? Then let me tell you about this place which will make you forget your age. You can experience the chilled air, forceful wind which is far better than AC. Have a bath under the natural shower of waterfall and you will definitely forget zakuni, and sauna baths. Experience the sunset from the peak of hill it and will show you its different shades on the water of river. Experience the twinkling lights of Mumbai city, Rasayani, Panvel and nearby areas from the height. So come, experience this exciting package of fun, happiness and refreshment and that too not far from Mumbai city.
How to Reach To the Fort?
This fort is visible from Mumbai- Pune highway. There is a way to fort from Shedung village which is at the point where the Kalamboli-Mumbai bypass road meets the Mumbai-Pune highway. 6 seater Minidor auto-rickshaws are available from Gandhi Hospital and Old Panvel to Thakurwadi. For a group of 10 people the auto-rickshaw (Minidor) fare  is around Rs. 200 to 250. Another choice is to catch the hourly State-Transport bus at the Panvel Bus Depot. The bus fare from Panvel to Thakurwadi bus is Rs. 14 per person. Thakurwadi is the terminal stop of this bus, and from Thakurwadi onwards you can complete your journey to the   fort on foot.

प्रबळगड आणि कलावंती दुर्ग बघितला आहे किवा पाहायचा आहे अशा हौशी पर्यटक मित्रांना, हा ट्रेक आणि निसर्ग सौंदर्यपूर्ण परिसर कसा अनुभवायचा? याच्याबद्दल माझे स्थानिक मत.. 
तुम्ही दीड तास पायपिट करून प्रबळ माची या गावामध्ये पोहचत. त्यावेळी तुम्ही खूप दमलेले असतात. मग कलावंतीण किवा प्रबळगडामधील एखादे ठिकाण बघून तुम्ही परत जातात. पण जर कलावंतीण तसेच प्रबळगड आणि आजूबाजूचा स्थानिक परिसर जर पूर्णपणेअनुभवायचा असेल तर मी एक स्थानिक म्हणून मार्गदर्शन नक्कीच देईन. तुम्ही एक रात्र गावामध्ये राहा. सकाळी माची गावामध्ये पोहचल्यावर चहा नास्ता करून कलावंतीण दुर्ग पाहायला जा आणि पुन्हा गावामध्ये आल्यावर गावाच्या उजवीकडे असणारे शिवशंकराचे मंदिर पाहू शकतात. गावाच्या कड्यावरून दिसणारा सुर्यास्त हे तर अदभूतपूर्व दृश्य आहे हे अनुभवा, संध्याकाळच्या संधीप्रकाशात कड्यावरुन पायखाली सोडून बसा आणि मनाला येईल तेवढ्या मोठ्या पडद्यावर खाली दरीत दिसणारा सोनेरी प्रकाश आणि त्यावर चमचमणा-या नदीचा आणि तिच्या तीराशी चाललेला रोमान्स अनुभवा. त्या सारखा आनंद जगातले कुठलेही मल्टीप्लेक्स देऊ शकणार नाही. विशेषकरून गावाच्या कड्यावरून रात्री लग्नसराईच्या लाईटिंगच्या प्रमाणे चमकणारे मुंबई शहर, रसायनी, पनवेल आणि आजुबजुचा प्रदेश कसा नटलेला दिसतो. त्यामुळे असा भास होतो कि शाही लग्नाचा समारंभ आहे, संध्याकाळचा हाडं गोठवणारा गारठा, रानवारा. मग याच्यापुढे एसी नक्कीच फिक्का पडेल. पावसात कड्यावरून समुद्राकडे घाई-घाईने वाट काढत जाणारे धोधो कोसळणारे धबधबे, शिवाय दुसऱ्या दिवशी प्रबळगड ट्रेकला जा. प्रबळगडाचा माथा म्हणजे एक मोठे पठार आहे. सर्व पठारी भाग हा जंगलाने व्यापलेला आहे. गडावर एक गणेशमंदिर आहे. तसेच चार पाच पाण्याच्या टाक्यासुद्धा आहेत. प्रबळगडावर अनेक बुरुज आहेत. तसेच कालाभूरुज आणि बोरीची सोंड यासारखी ठिकाणी आहेत, काळ्याभूरुजावर एक मोठा चुन्याचा ढीग आहे. हा चुन्याचा ढीग भूरुज बांधण्यासाठी पूर्वी वापर करण्यात आला असेल असे वाटते. गडावर तीन चार इमारतींचे अवशेष आहेत. घनदाट जंगल असल्याने हे सगळे बघणे वाटाड्याची गरज भासते. गडावरून माथेरान, मोरबे धरण, तसेच कालाभूरुज आणि बोरीची सोंड यासारख्या ठिकाणाचे विविध पाँईंटस् फार सुंदर दिसतात. या दुर्गावरून भोवताली असणारे माथेरान, चांदेरी व पेब दुर्ग, एर्शल गड,कर्नाला किल्ला व समोर असणारे मुंबई शहर सहजपणे ओळखून येते. प्रथम इंग्रजांनी प्रबळगडाचा माथेरान सारखे थंड हवेचे ठिकाण म्हणून विकसित करण्याचा विचार केला होता. मात्र पाण्याच्या दुर्भिक्षतेमुळे तो विचार मागे पडला. हे सगळे पाहून झाल्यावर पुन्हा माचीगावात येऊन थोडा आराम करून संध्याकाळची बस पकडून परतीचा मार्ग धरावा. यामुळे तुमचा प्रबळगड आणि कलावंतीण ट्रेक तर होईलच पण आजूबाजूचा निसर्ग परिसराचा आनंद पण मिळेल. त्यामुळे ट्रेकच्या निमिताने एक पिकनिक चा अनुभव नक्कीच येईल
गडावर पोहचायचे कसे..
हा गड मुंबई-पुणे हायवेवरून दिसतो. मुंबई-पुणे जुन्या नॅशनल हायवेवर शेडुंग फाट्यापासून गडाकडे जायचा मार्ग आहे. कलंबोळीपासून पनवेल बायपासने आल्यास जेथे मुंबई-पुणे जुना हायवे जोडला जातो. तेथे शेडुंग फाटा लागतो. शिवाय पनवेल वरुण (गांधी हॉस्पिटल) जवळ सहा आसनी मिनीडोर (टमटम) रिक्षा भाड्याने करुन ठाकुरवाडी गावामध्ये उतरावे. १० लोकांचे साधारणतः 200 -250 रुपये द्यावे लागतात.आणि दुसरा उपाय म्हणजे पनवेल ते ठाकुरवाडी बससेवा आहे . प्रत्येक व्यक्ति मागे 12 रुपये बसचे टिकीट आहे .ठाकुरवाडी पर्यंत आल्यावर तेथून तुमची प्रबल गडाकडे जाण्यासाठी पायी यात्रा सुरु करावी लागते.



PrabalGad (fort):
This fort was built to keep an eye on the ancient ports of Panvel and Kalyan situated in North Konkan. From the study of the caves in this fort it is estimated that it belongs to the time of Buddha. The Shilahar and Yadav dynasties made it an army camp because of the strong man-made caves engraved in this fort and named it ‘Muranjan’. It was built at the time of the Bahamani Empire. Afterwards it came under the Nizam Shahi dynasty of Ahmednagar. When the Nizam Shahi dynasty was on the verge of collapse, Shahaji Raje came to their support, but the Mughal emperor Shahajehan and Adil Shah of Bijapur both sent their army separately to defeat Shahaji. When Shahaji came to know this, he moved his army to fort Kondhana and fort Murumbdev. He then requested help against the Mughal and Adilshahi forces from Siddhis of Janjira, but was refused. So Shahaji tried to get help from the Portuguese in the city of Chaul, but failed again. Finally Shahaji, with his wife Jijabai and son young Shivaji moved on Muranjan fort along with army. Later in 1636 Shivaji left Muranjan fort. In the same year 1636  the Agreement of Mahuli was made according to which the North Konkan went under the Mughal Empire who granted authority to Adilshaha of Vijapur to rule the area in return for tribute. Shivaji grabbed this opportunity. He defeated More of Javli and captured the Javli area. At the same time a brave Sardar of Shivaji, Abaji Mahadev won the area of Kalyan, Bhiwandi and Rayri. That time fort Muranjan came under swarajya of Shivaji. Shivaji changed the name of this fort from “Muranjan" to "Prabalgad" (Prabal means "strong"). Later on, in 1665, according to Treaty of Purandar, Prabalgad was one of the twenty-three forts which were handed over to the Mughal empire. The Mughal Sardar Jaysingh placed a Rajput named Kesarsingh Hada in charge of the fort Prabalgad. In 1658, the Marathas under Shivaji re-took the fort once again. The Mughal Sardar Kesar Singh committed suicide realising that defeat was imminent. The Rajput ladies in the fort commited Jauhar (self-immolation) to escape dishonour. The mother and son of Kesar Singh who had hidden themselves in the fort were granted freedom by the order of Shivaji. In the investigation of the fort great amount of wealth was found.
Prabalgad Bhatkanti:
The flat top area of the fort is covered by dense forest. There is a Ganesh Temple at the top. There are also some scenic ruins of old buildings and a few water tanks. In order to explore them you will need a local guide. The British Government wanted to develop Prabalgad as a hill station like Matheran but were thwarted in this plan on account of the difficulties caused by the lack of water which, though sufficient for the existing residents, would not have met the requirements if more people had come to stay as per their plan. Because of the dense forest it is not always easy to find paths for walking, but if you persevere and reach the   top of the fort you will be rewarded with a panoramic view of the of different points of Matheran, the neighbouring hill-station.   
                                                               
Kalavantin Durg (Fort):
This fort is just opposite to Prabalgad. It is also visible from Mumbai-Pune highway. According to stories, the fort was built for a queen named Kalavantin. Steps leading up to the fort have been cut into the rock face of the hill. From the peak of this hill you can see Matheran, Chanderi, Peb, Ershal, and Karnala forts, and also the Mumbai city. The Adivasi People of Machi-Prabal village observe the custom of dancing on every Holi (Shimga) Festival at the top of Kalavantin  fort. These people have a long-standing relationship with this fort and it has become a part of their heritage. 
प्रबळगड इतिहास..
उत्तर कोकणातील हा किल्ला त्याच्या मुलुखात असलेल्या पनवेल, कल्याण या प्राचीन बंदरांवर नजर ठेवण्यास असावा. किल्ल्यावरील गुहांच्या अभ्यासावरुन त्यांचा कालखंड बौद्ध कालाशी जोडता येतो. त्यांच्यावरील मनुष्यनिर्मित गुहांमुळेच उत्तरकालातील शिलाहार, यादव या राज्यकर्त्यांनी त्याला लष्करी चौकी बनवून नाव दिले. मुरंजन.बहामनीच्या कालात हा किल्ला आकारास आला असावा. नंतर अहमदनगरच्या निजामशाहीच्या ताब्यात तो आला. निजामशाहीच्या अस्तावेळी शहाजीराजांनी निजामशाहीच्या वारसाला छत्र धरून निजामशाही वाचवण्याचा प्रयत्न केला. पण मोगल शहाजहान आणि विजापूरचा अदिलशहा यांनी तह करून आपल्या संयुक्त फौजा शहाजीराजांच्या मागावर पाठवल्या. तेव्हा शहाजीराजे पळ काढून कोंढाणा व मुरंबदेवाच्या डोंगरात निघून गेले. नंतर कोकणात जंजिऱ्याच्या सिद्दिकडे गेले असता त्याने आश्रय नाकारल्यावर चौलला पोर्तुगीजांकडे गेले. पण त्यांनीही नकार दिल्यावर शहाजीराजे जिजाऊ, बालशिवाजी आणि लष्करासह मुरंजनावर गेले. सन १६३६ मध्ये बालशिवाजींनी मुरंजनाचा उंबरठा ओलांडला. १६३६ मध्ये माहुलीचा तह झाला. त्यात उत्तर कोकण मोगलांच्या ताब्यात गेले आणि मुरंजनवर मोगली अंमल सुरू झाला. पण प्रत्यक्षात तेथे विजापूरच्या अदिलशहाचीच सत्ता होती. पुढे ही संधी शिवरायांनी साधली. जेव्हा शिवरायांनी जावळीच्या चंद्रराव मोरेला हरवून जावळी ताब्यात घेतली, त्याचवेळी म्हणजे १६५६ मध्ये शिवरायांचा शूर सरदार आबाजी महादेव याने कल्याण भिवंडी पासून चेऊल ते रायरीपर्यंतचा सारा मुलूख स्वराज्यात घेतला. तेव्हा मुरंजन शिवाजी महाराजांच्या ताब्यात आला. किल्ल्याचे नाव बदलून किल्ले प्रबळगड असे ठेवण्यात आले. पुढे १६६५ मध्ये पुरंदरच्या तहानुसार मोगलांना दिलेल्या २३ किल्ल्यांमध्ये प्रबळगड शिवाजी महाराजांनी दिला. जयसिंगाने किल्ल्यावर राजपूत केशरसिंह हाडा हा किल्लेदार नेमला. पुढे पुरंदरचा तह मोडला. मराठे किल्ले परत घेत असतांना मराठयांशी झालेल्या लढाईत केशरसिंह धारातीर्थी पडला. तत्पूर्वी राजपूत स्त्रियांनी जोहार केला. केशरसिंहाची आई व दोन मुले किल्ल्याच्या झडतीत सापडले.शिवरायांच्या आदेशानुसार त्याने सन्मानाने देऊळगावी मोगल छावणीत पाठवण्यात आले. नंतर किल्ल्यावर खोदकामात बरीच संपत्ती आढळली.
कलावंतीण दुर्ग इतिहास.हा दुर्ग मुंबई पुणे हायवेवरुन सहजपणे दिसतो. कोण्या राज्याचे कलावंती राणीवर खूप प्रेम होते. कलावंती राणी आपल्याला सोडून न जावी म्हणून त्या राज्यांनी कलावंती राणीला त्या किल्यावर महल बांधला होता. हा दुर्ग प्रबल गडाच्या लगतच्या भागाला लागून आहे. संपूर्ण दुर्ग चढ़ण्याकरिता खडक कापून पाय-या बनवल्या आहेत. या दुर्गाशी माचीप्रबळ गावामधील आदिवासी लोकाचे खूप जिव्हाळयाचे नाते आहे. ते प्रत्येक वर्षी शिमग्याच्या सणाला या दुर्गावर आदिवासी नुर्त्य करतात. या दुर्गावरून भोवताली असणारे माथेरान, चांदेरी व पेब दुर्ग, एर्शल गड, कर्नाला किल्ला व समोर असणारे मुंबई शहर सहजपणे ओळखून येते.
Dear Tourist,
Machi Prabal is an ancient and beautiful village. It is situated half-way up a mountain (such a plateau or ledge is called a "machi" in Marathi) at the base of the fort Prabalgad. Because of the two forts Prabalgad and Kalavantin and the natural beauty of the surrounding regions, many visitors and fort-enthusiasts are attracted to this place.
To fully explore this area, you will need at least two days. However, many visitors have had some difficulty in finding food and lodging near this village. Some visitors would return home after one day tour and others would spend the night sleeping outdoors on the grass and eating whatever they could bring or manage to obtain. It is also hard for ladies and children to stay here comfortably. 
 My name is Nilesh Bhutambre (I am called "Bhau" by those close to me, especially by everyone in my village). I’m the only “Adivasi" boy to graduate from my village.  One day, while i was searching for information about my village and the fort of Kalavantin Durg and Prabalgad, i saw that there are lot of tourists who visit this fort and report on their blog or website. Some of these tourists motioned that there is no facility available for food or accommodation.  That is when I decided to provide these facilities to Prabalgad and Kalavantin Durg tourists.  My Graduation and Diploma in Programming Language helped me make web page to spread the word about my idea and services. 
Our services include Kalavantin Durg & Prabalgad Dharshan Guide, Food & Accommodation. We are also offering a tour package including everything you would require. The Bhutambare family provides these services using their own home as the base of operations.

Suggestions and feedback about the services provided by this venture are most welcome. Your suggestions will help us improve the service experience that we provide to other tourists like you. 
                                                        Website :-http://prabalgad.jigsy.com/                                                                                                 

Please e-mail your suggestions to: neel.nilesh0506@gmail.com   or kalavantinprabalgad@gmail.com


You can contact me through my mobile-phone at 08056186321 (Please remember to add the "0" at the beginning.)
You are also welcome to read our blog to learn about news & updates from our side:  http://prabalgad.blogspot.in/ 
तुमच्या प्रतिक्रियेची गरज :-
माझे नाव निलेश भुतांब्रे, प्रबळगडाच्या पायथ्याशी माझे गाव वसलेले आहे. शिक्षण क्षेत्रात पदवी घेणारा माझ्या गावामधून मी एकमेव आदिवासी मुलगा. हे गाव प्रबळगडाच्या ऐतिहासिक क्षेत्रात तर येतेच व निसर्ग सौंदर्यपूर्ण आहे.  गावाच्या वरच्या बाजूला प्रबळगड व त्याला लागुन कलावंती दुर्ग आणि आजूबाजूचा नैसर्गिक परिसर, विशेष करून या स्थानाकडे पर्यटकांचा वाढता कल आहे. त्याच बरोबर पर्यटकांची होणारी गैरसोय. हे सर्व बघायचे, आनुभवायचे तर दोन दिवस पाहिजे. मग रहायचे कुठे? खायचे काय? हे प्रश्नआहेतच. मग यावर उपाय म्हणून काही पर्यटक गडाच्या पायथ्याशी असणाऱ्या गवातामध्ये राहतात, काही तरी खाऊन कशीबशी रात्र काढतात? नाहीतर एका दिवसामध्ये कोणते तरी एक ठिकाण पाहून घरी जायचे हे पक्के. रात्री गावामध्ये रहाणारे ग्रुप बघितले तर ते फ़क्त पुरुषवर्गांचेच? फॅमिली व महिला असणारे ग्रुप फ़क्त दिवासाच पाहायला मिळतात. याचे कारण काय ? याचे कारण एकच की रात्री गावामध्ये राहाण्याची, खाण्याची-पिण्याची होणारी गैरसोय ? हा ऐतिहासिक भाग पूर्ण न करता तेथील आजूबाजूचा नैसर्गिक परिसराचा अनुभव घेण्याकरिता, नुसती पुरुषी पिकनिक न करता, फॅमिली, लेडीस, जेन्ट्स ग्रुप पिकनिक करण्याकरीता व रात्री गावामध्ये राहाण्या, खाण्याची-पिण्याची होणारी "गैरसोय" दूर करण्याकरिता.. पर्यटकांची पायपिट दूर करण्याकरिता... या सगळ्या अडचणीवर मात करण्यासाठी मी गावामध्ये  दोन दिवस व एक रात्र  असे मिळून  ट्रेकिंग व सहल  प्याकज  पुरवत आहोत तसेच   हॉटेल आणि लॉगिंग सेवा  पुरवत  आहे. यासाठी मला तुमच्या मार्गदर्शनाची आणि तुमच्या प्रतिक्रियेची गरज आहे. त्यामुळे मी पर्यटकांना त्यांच्या इच्छेनुसार चांगली सेवा देऊ शकेन. मी तुमच्या प्रतिक्रियेची आतुरतेने वाट बघेन तसेच प्रस्ताव, सम्मोहन, संकेत पाठवण्याची कृपा करावी..